पदवीधर निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अमरावती | भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil)  यांचा अमरावती पदवीधर निवडणुकीत पराभव झालाय.

रणजित पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ते याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.

रणजित पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून फेरमोजणी करण्यात आली. या सगळ्या कार्यप्रणालीला तब्बल 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला.

अखेर अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरल लिंगाडे विजयी झाले आहेत.

अमरावीत मतदारसंघाची निवडणूक इतकी अटीतटीची ठरेल अशी कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अखेर या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरल लिंगाडे यांनी बाजी मारली.

महत्त्वाच्या बातम्या-