Badlapur Crime | बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असल्याचं कालपासून पाहायला मिळत आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त करत काल नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलिसांनी पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखलं होतं. तसेच आंदोलनात सहभागी झाल्यास एफआयआर दाखल करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांचा खुलासा
डॉक्टरांनी पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितलं होतं. पण पोलिसांनी 12 तासांनंतरच एफआयआर दाखल केला. तसेच घटनेनंतर आरोपी कुठेच सापडला नाही. मात्र अचानक 17 ऑगस्टला तो कसा सापडला हे आम्हाला माहीत नाही, असं देखील पीडित कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
आम्ही शाळेत असताना महिला पोलीस अधिकारी देखील दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाहेर बसायला लावले आणि महिला पोलीस अधिकारी एकट्याच खोलीत गेल्या आणि त्यांनी शाळाप्रशासनासोबत चर्चा केली.
Badlapur Crime | “आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न”
खोलीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नका. यावेळी आम्ही त्यांना आमच्याकडे वैद्यकीय पुरावे असल्याचे देखील सांगितलं मात्र त्यांनी काही एक ऐकलं नाही. या शाळेचा राजकारणी नेत्यांशी काहीतरी संबंध आहे, त्यामुळे महिला अधिकाऱ्याने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला.
दरम्यान, अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना मरेपर्यंत फाशी द्यावी. अशा अनेक घटना घडत आहेत, जर आपण उदाहरण ठेवले नाही तर अशा घटना घडतच राहतील. त्यामुळे सरकारने अशा व्यक्तीला फाशी द्यावी. जो माणूस असा गुन्हा करेल त्याला माहित आहे की त्याला काहीही होणार नाही, एकतर तो जन्मभर तुरुंगात राहील किंवा 12 वर्षांनी सुटका होईल, त्यामुळे त्यांना कोणतीही भीती नाही, असं पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभेला मनोज जरांगे पाटील नवा खेळ खेळणार?
’30 वर्षांमध्ये असं…’; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून सरन्यायाधीश संतापले
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका!; अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खा; संसर्गाचा धोका होईल कमी