Big Offer ! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| पेट्रोल-डिझेल दरात होणाऱ्या वाढीमुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहे. त्यामुळं रस्त्यावर आपण पाहिलं तर अनेक इलेक्ट्रिक गाड्या दिसत आहेत. अशातच आता जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना आलेले महत्व पाहता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर आकर्षक ऑफर ठेवत आहेत. अशातच आता ओला एस प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवरही(Ola S1 Pro Electric Scooter) सध्या भन्नाट ऑफर सुरू आहे. या ऑफरद्वारे तुम्ही एक रूपया न भरताही ही स्कूटर खरेदी करू शकता.

सध्या एस प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर खास ऑफर अशी आहे की, तुम्ही डाऊनपेमेंट न करता स्कूटरची पूर्ण किंमत फायनान्स करू शकता. त्यामुळं आता पैसे नसतानाही तुम्ही ही स्कूटर तुमच्या घरी आणू शकता.

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर ‘डिसेंबर टू रिमेंबर’ या योजनेअंतर्गत ग्राहकांना दहा हजार रूपयांची सूटही मिळत आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत दीड लाख रूपये आहे. त्यामुळं जर तुम्ही ही स्कूटर डिसेंबर महिन्यात खरेदी केली तर तुमचे दहा हजार रूपये वाचू शकतात.

या स्कूटरवर कंपनी आणखी एक खास ऑफर देत आहे. तुम्ही फायनान्स केल्यानंतर अत्यंत कमी व्याजदार लागणार आहे. म्हणजे व्याजदर फक्त 8.99 टक्क्यांपासून सुरू आहे. तसेच ईएमआय(EMI) देखील 2499 रूपयांपासून सुरू होत आहे.

ही स्कूटर घेताना जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घेतली तर तुम्हाला पाच टक्के अतिरिक्त सूट मिळते. परंतु ही ऑफर फक्त ठराविक बॅंकांच्याच क्रेडिट कार्डवरच उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-