Big Offer | ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

मुंबई | दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या(Electric Vehicle) मागणीत वाढ होत आहे. त्यामुळं गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही एकापेक्षा एक इलेक्ट्रिक गाड्यांचे माॅडेल बाजारात आणत आहेत. त्यातच काही कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांवर काही खास ऑफर्सही(Big Offer) देत आहेत.

सध्या ओला कंपनीच्या एस वन (OLA S1 )आणि एस वन प्रो (OLA S1 Pro)या स्कूटरवर आकर्षक ऑफर सुरू आहे. त्यामुळं जर तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

ओला कंपनीच्या या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये तुम्हाला इको आणि स्पोर्ट मोड दिले जातात. तुम्हाला नाॅर्मल मोडमध्ये 100 किमी रेंज मिळते. इको मोडवर 125 किमी रेंज मिळते तर स्पोर्ट्स मोडवर तुम्हाला 90 किमी पर्यंतची रेंज मिळू शकते.

अशा उत्तम फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्टूटरवर सध्या डिस्काउंट सुरू आहे. ओला एस वनवर सध्या दोन हजार रूपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच ओला एस वन प्रो या गाडीवर चार हजार रूपयांचा कॅशबॅक आणि दहा हजार रूपयांची सूट मिळत आहे.

10 हजार रूपयांची सूट 31 डिसेंबर पर्यंतच मर्यादित असेल तर कॅशबॅकची ऑफर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे. त्यामुळं जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ओला कंपनींच्या या गाड्यांचा विचार करू शकता.

तसेच तुम्हाला कमीत कमी व्याजदर असणार आहे. तसेच एक रूपयाही न भरता तुम्ही पूर्ण रक्कम ईएमआयमध्ये(EMI) भरू शकता. परंतु ही ऑफर काही निवडक बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरच उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More