आताची सर्वात मोठी अपडेट!, वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळणार?

Beed News

Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. कारण या हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतर आरोपींवर याआधी देखील अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी होत आहे. मात्र, या गोष्टी होत असतानाच आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

महिन्याभरापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्दयीपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अटक केली असून 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गुन्हा दाखल नसला तरी या सगळ्याचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे.

मात्र, आता वाल्मिक कराडने (Walmik Karad) पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड याने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे वाल्मिक व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत.

कराडचे व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार???

समोर आलेल्या माहितीनूसार, 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कराडने चाटेच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता. मात्र, आता विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला नसला तरी, पोलिस त्याचा तपास करत आहेत. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत.

मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीकडून कलेक्ट करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो. तर वाल्मिक कराड याचेही व्हाईस सॅम्पल घेऊन ते मॅच होतात का हे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

News Title : biggest evidence police found about walmik Karad?

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार

बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह

राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…

जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .