HDFC Bank | देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये. बँकेने काही नवीन नियम काढले आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
बँकेच्या ग्राहकांना (HDFC) ठराविक रकमेपेक्षा कमी यूपीआय व्यवहारांसाठी एसएमएस प्राप्त होणार नाहीत. बँकेने हा निर्णय घेतला असला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होणार नाही. 25 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.
ही सेवा होणार बंद
एचडीएफसी बँकेने (HDFC) ग्राहकांना पाठवलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले की, 25 जून 2024 पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेमध्ये काही बदल केले जात आहेत.
तुम्ही यूपीआयद्वारे एखाद्याला 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तरच एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. त्याचप्रमाणे 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास एसएमएस अलर्ट पाठवला जाईल.
HDFC बँकेचा निर्णय काय?
आतापर्यंत एचडीएफसी बँक (HDFC) तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर संदेश पाठवते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कोणतेही पेमेंट करता किंवा तुमच्या खात्यात कुठूनतरी पैसे प्राप्त करता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लगेच एसएमएस येतो. हा व्यवहार 10 रुपयांचा असला तरी संदेश मिळतो. आता ही प्रणाली संपुष्टात येऊन पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होणार आहे.
ईमेल अलर्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहारांवर ईमेल अलर्ट मिळत राहतील. बँकेने सर्व ग्राहकांना त्यांचे ईमेल अपडेट करण्यास सांगितले आहे. बँकेने सर्व ग्राहकांना ईमेल अपडेट करण्यासाठी लिंकही पाठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
ओबीसींच्या शिष्टमंडळात कोण?, महत्त्वाची माहिती आली समोर
“मला लग्नव्यवस्था पटत नाही, त्यापेक्षा लिव्ह इन…”, सैराटफेम तानाजीचं मोठं वक्तव्य
राज्यातील पोलीस भरतीबाबत देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई