MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!

पुणे | MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. MPSC ने आपला नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये, म्हणणं आंदोलक विद्याथ्यांचं होतं.

नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख 4 मागण्या आंदोलकांच्या होत्या.

सध्या MPSC परीक्षा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्यायवाचक पद्तीनं होती. ज्यात प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या ४ पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो. पण नव्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिपटिव्ह म्हणजे वर्णनात्मक होणाराय. ज्यात प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे लिहावं लागेल.

दरम्यान, याच नव्या पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध होता. अचानक नव्या पद्धतीचा अभ्यासामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होणार होतं.

महत्त्वाच्या बातम्या-