मुंबई | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची आज चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आलीये.
चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मी वक्ता म्हणून आलो होतो. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कॉफी प्यायला बोलावलं, असं प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सांगितलं.
शरद पवार यांच्यासोबत कॉफी घेतली. आम्ही एकूण 12 जण होतं. एवढ्या लोकांमध्ये राजकीय चर्चा होईल अशी अपेक्षा नाही. मी महाविकास आघाडीवर बोलणार नाही. कारण त्याबाबत काहीच घडलं नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं काही वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. शासनाने जरांगे पाटलांशी इमानदारीने बोलावं. चार महिने, दोन महिने देत आहे असं करू नये. कुणी बोलत नाही. पण शासनाला सांगतो, गावात गेलो तर 20-25 वर्षांच्या तरुणांच्या हाताला कामं नाहीत. त्यांची लग्न झालेलं नाहीत. हा लँडेड क्लास आहे. या वर्गाच्या कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. व्यक्तिगत समस्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘माझ्या हातात सत्ता आली तर..’ राज ठाकरेंनी पुणेकरांना दिला शब्द
- ‘नवीन जोडप गेलं तर त्यांनी काय पकडापकडी खेळायची का?’; राज ठाकरे संतापले
- ‘तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील…’; कंत्राटी भरतीवर अजित पवार स्पष्टच बोलले
- “देवेंद्र फडणवीस भांग पीत नसतील, पण…”
- ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर