एलआयसी पॉलिसीधारकांना सर्वात मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | देशभरातील पॉलिसीधारकांना (Policy) मोठा धक्का बसणार आहे. आता एलआयसी (LIC Policy) पॉलिसी घेतल्यानंतर देखील कर भरावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी केंद्र सरकार एलआयसीवर भरमसाठ कराचा लाभ देत होतं, परंतु यावेळी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, एलआयसी पॉलिसी घेऊनही लोकांना कर भरावा लागणार आहे.

आयकर नियमांनुसार, एलआयसीची पॉलिसी खरेदी केल्यास कर सवलतीचा लाभ मिळतो. करमुक्तीमुळे विमा कंपन्या अतिशय मजबूत स्थितीत आहेत. ग्राहक बहुतांशी कर वाचवण्यासाठी एलआयसीची पॉलिसी घेतात.

2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, आतापासून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर कर भरावा लागेल.

सरकार देशभरात न्यू टॅक्स रिजीमला प्रोत्साहन देत आहे. ज्यामध्ये करात सूट नाही. म्हणजेच, जे आता कर वाचवण्यासाठी एलआयसी पॉलिसी घेतात, ते भविष्यात ती घेणं बंद करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-