बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सला ‘या’ टीमपासून सर्वात मोठा धोका”

मुंबई | यावर्षीचा ‘आयपीएल’ हंगाम 3 दिवसांवर येऊन ठेपला असताना यंदाच्या ‘आयपीएल’वर ‘आयपीएल’ ‘आयपीएल’ चं संकट आणखीनच बळावलं आहे. मुंबईत ‘आयपीएल’चे 10 सामने खेळले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘आयपीएल’ सामने हे वेळापत्रकानुसार आणि वेळेवरच होतील असं सरकारकडून स्पष्ट केलं गेलं आहे. तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर मोहर लावली आहे.

याचदरम्यान, माजी क्रिकेटर आकाश चोप्राने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितलं की, दिल्ली कॅपिटल हा एकमेव संघ आहे जो या ‘आयपीएल’मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला टक्कर देऊ शकतो. दिल्लीच्या संघाने मागच्या ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी केली होती. तो संघ पहिल्यांदा ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात पोहचला होता, असं देखील त्याने सांगितलं.

मागील ‘आयपीएल’मध्ये अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सने पछाडलं होत.  मात्र, यंदाच्या हंगामात ते एक पाऊल पुढे जाऊन ‘आयपीएल’ स्पर्धा आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न जरुर करतील. दिल्ली कॅपिटल्सकडे चांगले गोलंदाज आहेत. कगिसो रबाडा आणि एनरिक नाॅर्ट्जे त्यांच्या संघात आहेत. आता क्रिस वोक्सला देखील संघात घेण्यात आलं आहे, असं आकाश चोप्राने सांगितलं.

दरम्यान, ब्रॉडकास्टिंग कर्मचाऱ्यांची स्टारसला चिंता आहे. जर मैदानात कर्मचारी आणि आयोजन समितीचे सदस्य कोरोनाग्रस्त होऊ शकतात तर, आमच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना होऊ शकतो. आम्ही त्यांच्या प्रकृती वर लक्ष ठेवून आहोत असं, ‘बीसीसीआय’ने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“बॅंडवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात तसं तुमचं झालंय का?”

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More