Top News

‘शेतकरी आंदोलन हे फक्त मूठभर दलालांचंच आहे’; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान, आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध करत शेतकरी आंदोलन केलं आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये बैठका झाल्या मात्र एकाही बैठकीत तोडगा निघालेला नाही. मात्र अशातच बिहारमधील कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी आंदोलनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरु आहे ते आंदोलन शेतकऱ्यांचं नसून फक्त मूठभर दलालांचं असल्याचं अमरेंद्र प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. बिहारमधील वैशाली येथील सोनापूर येथे ते माध्यमांशी बोलत होते.

देशात 5.5 लाख गावं आहेत. कोणत्या गावचे शेतकरी आंदोलन करत आहेत? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का?, 5.5 लाख गावातील शेतकऱ्यांना या आंदोलनाशी काही घेणंदेणं नसल्याचं अमरेंद्र प्रताप सिंह म्हणाले.

दरम्यान, जर हे खरोखरच शेतकरी आंदोलन असतं तर पुर्ण भारत पेटुन उठला असता, असंही प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘निट काढलास ना रे फोटो’; सहा वर्षाच्या रुद्रने केलं पाटलांचं खास फोटोशुट

…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो

कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या