शिक्षकी पेशाला काळीमा! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण, 20 रुपयांचं दिलं आमिष

Bihar Crime School Principal Sexually Assaults Minor Girl 

Bihar Crime | बिहारमधील (Bihar Crime) जमुई (Jamui) येथील एका सरकारी शाळेत एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने (Principal) दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याचा आरोप आहे. शमशेर आलम असे या मुख्याध्यापकाचे नाव असून, त्याने 20 रुपयांचे आमिष दाखवून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

‘तोंड बंद ठेव, पैसे आले तर तुला सर्वात आधी मिळतील’

“हे घे 20 रुपये, तुझं तोंड बंद ठेव, पैसे आले तर तुला सर्वात आधी मिळतील,” असे आरोपीने म्हटल्याचे पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले. या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीने शाळेत जाणे बंद केले.

मुलीच्या आई-वडिलांनी तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारले असता, ती रडू लागली आणि तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. शाळेतील मुख्याध्यापकाने केलेले कृत्य ऐकून त्यांना धक्काच बसला.

गावकऱ्यांचा संताप, मुख्याध्यापकाला चोप

ही घटना उघडकीस येताच शाळा परिसरात गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली आणि त्यांनी मुख्याध्यापकाविरोधात तीव्र निदर्शने केली. पीडितेच्या आजीने रागाच्या भरात शमशेर आलमला चपलेने मारहाण केली. संतप्त गावकऱ्यांनी आलमविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.

“समशेर आलम हा दिव्यांग असून त्याच्या डोक्यात विकृती भरलेली आहे,” असे गावकरी म्हणाले. “आलम शिक्षक आहे, डॉक्टर नाही. मागील आठ दिवसांपासून माझी मुलगी शाळेत जायला नकार देत होती आणि घरातून पळून जात होती,” असे मुलीच्या आईने सांगितले. “आईच्या वारंवार विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. सरांनी माझ्या पोटाला हात लावला आणि कुणाला काही सांगू नको, असे म्हटले,” हे मुलीने आईला सांगितले. “हा शिक्षक बनण्याच्या लायकीचा नाही,” अशा संतप्त भावना मुलीच्या आजीने व्यक्त केल्या. (Bihar Crime)

आरोपी आणि गावकऱ्यांचे म्हणणे

शाळेतील मुख्याध्यापक खूप चुकीचे काम करतो, त्याचा स्वभाव आधीपासूनच खराब आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांसोबतही तो चुकीचं वागतो. जर कुणी गावकरी त्याची तक्रार करायचा तर त्याला ‘तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी देत होता, असे गावातील केसाबिर अंसारी यांनी सांगितले. तर, “माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. मी 14 वर्षे या शाळेत कार्यरत आहे. जर गावकऱ्यांना तक्रार होती, तर त्यांनी विभागाला कळवायचे होते. आरोप सिद्ध झाले असते, तर त्यांनी कारवाई केली असती,” असा दावा आरोपी समशेर आलमने केला आहे.

Title : Bihar Crime School Principal Sexually Assaults Minor Girl 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .