बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत यांना बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

बिहार | अभिनेता सुशांत सिंग राजूपत आत्महत्या प्रकरण आता राजकीय वर्तुळातंही महत्त्वाचा मुद्दा ठरतंय. या प्रकरणाचा बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावर निशाणा साधला होता.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या तपासामागे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामन्याच्या ‘रोखठोक’ सदरातून केला होता. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला पांडे यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

आयुष्यभर निष्पक्ष राहुन निष्ठेने सर्वसामान्यांची सेवा केली आहे. माझ्यावर अनेक तथ्य नसलेले आरोप लावण्यात येत आहेत. ज्यांचं उत्तर देणं योग्य होणार नाही. परमेश्वर प्रत्येकाचं रक्षण चांगल्या पद्धतीनं करतो. हवा पण वाहत राहते, दिवा पण जळत राहतो. मला जितक्या हव्या तितक्या शिव्या द्या, पण सुशांतला न्याय मिळावा, असं गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून म्हटलंय.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून बिहार पोलीस आणि केंद्र सरकार मिळून महाराष्ट्र सरकारविरूद्ध कट रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More