बिहार | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर सुरूवातीच्या काही फेऱ्यांमधून निकालाचा कल येताना दिसतोय.
मतमोजणीला सुरूवात झाली असून काही फेऱ्यानंतर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस प्रणित महाआघाडीने आघाडी घेतली आहे. महाआघाडी 99 जागांवर पुढे आहे. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 87 जागांवर आघाडीवर आहे.
पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने आघाडी घेतलीये. हा कल पाहता कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केलीये.
कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक मानली जातेय. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं असून नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार का हे आज स्पष्ट होणारे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!
अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम
कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण जगासाठी मोठी बातमी!
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली, अन्…
बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख