बिहार सरकारने वृद्धांसाठी केली ‘या’ नव्या पेन्शन योजनेची घोषणा

पाटणा | बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ असं या योजनेचं नाव आहे.

‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वय आणि पात्र असलेल्या सर्वांना मासिक 400 रूपये तर 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 500 रूपये प्रति महिना दिले जाणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 18 हजार कोटी रूपयांचा निधी तयार केला असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असून 35 ते 36 लाखांपर्यंत अर्जाचा आकडा जाईल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू

-रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

-“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”

-रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले