Top News देश राजकारण

बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

बिहार | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा वाढदिवसा देखील आहे. या निमित्ताने पटनाच्या रस्त्यावर शुभेच्छांचे पोस्टर्स लावण्यात आहेत. यामध्ये निकालांच्या आधीच राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत शुभेच्छा दिल्यात.

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना निकालाच्या दिवशी अतिउत्साहात कोणत्याही प्रकारची गडबड करू नका अशा सूचना दिल्यात.

यासंदर्भाच ट्विट करत तेजस्वी यादव म्हणाले, “आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं, निकाल काहीही असला तरी, तो संयम आणि साधेपणा स्वीकारावा. फटाके, आनंदात गोळीबार करणं, प्रतिस्पर्धी किंवा त्यांच्या समर्थकांशी असभ्य वर्तन करणं या गोष्टी करू नये.”

महत्वाच्या बातम्या-

‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन

लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा; शिवसेनेचा भाजपाला टोल

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या