Top News देश

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

बिहार | केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं आज निधन झालंय. त्यांच्यावर दिल्लीतील रूग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चिराग पासवान लिहितात, पप्पा… तुम्ही या जगात नाहीत. पण, मला माहीत आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात.”

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.

महत्वाच्या बातम्या-

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या