बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

वाळवंट, बर्फाची महाकाय शिखरं, डोंगरदरीचा भाग या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं शौर्य दाखवणारी भारतीय सैनिकांची तुकडी म्हणजे बिहार रेजिमेंट. भारतभूमीला सुरक्षित ठेवण्याचा गौरवशाली इतिहास याच तुकडीच्या नावावर आहे. या सैनिकांचा दरारा इतका की शत्रू राष्ट्र या तुकडीला किलर मशीन, जंगल वाॅरियर्स व बजरंग बली आर्मी अशी बिरूद लावूनही ओळखतो.

गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीननं भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू देखील या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेमुळं देशभरात तिव्र संतापाची लाट उसळली असताना, बिहार रेजिमेंटच्या शौर्याचंही भरभरून कौतुक केलं जातंय.

बिहार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली ब्रिटिश सरकारच्या काळात झाली. या तुकडीचं मुख्यालय दानापूर कैंट, पटना याठिकाणी आहे. भारतातील सर्वात जुन्या कॅन्टोन्मेंटपैकी बिहारची सर्वात जुनी ओळख आहे. सध्या बिहारमधूनच नाही तर देशभरातून तरूण या तुकडीत सेवा करायला मिळावी, असं स्वप्न मनाशी बाळगून असतात. भारताच्या जवळपास सर्वच लढाईत या रेजिमेंटच्या सैनिकांनी मोलाचं योगदान दिलं आहे.

बांग्लादेश मुक्तीसंग्राम हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं देशपातळीवरच पहिलं आव्हान ठरलं. पाकिस्तानच्या ९६ हजार सैनिकांनी बिहार रेजिमेंटच्या समोरच शरणागती पत्करली होती. पाकिस्तानचे सैनिक या रेजिमेंटच्या सैनिकांना एवढे घाबरून होते, की त्यांनी युद्ध करण्यास साफ नकार दिला होता.

जगाच्या इतिहासातली ही पहीलीच लढाई असावी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष लढाई न होता एवढ्या सैनिकांनी शरणागती पत्करली असावी. हा करिश्मा केवळ बिहार रेजिमेंटच करू शकतं. बिहार रेजिमेंटच्या या कामगिरीवरून त्यांच्या कुवतीचा अंदाज बांधता येणं शक्य होईल.

कारगिल युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी घुसखोरांनी पाॅइंट ४२६८ वर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहार रेजिमेंटच्या शूरवीरांनी पाकिस्तानचे हे मनसुबे उधळून लावले. एवढंच नव्हे तर बिहार रेजिमेंट बटालीयनचं नाव काढलं तरी पाकिस्तानी सैनिक थरथर कापत असत, एवढा या सैनिकांचा युद्धात दबदबा कायम होता.

बिहार बटालियनचं घोषवाक्य ‘कर्म ही धर्म है’ असा आहे. या रेजिमेंटचे सैनिक जेव्हा शत्रूवर हल्ला करतात तेव्हा ‘जय बजरंगबली’ आणि ‘बिरसा मुंडा की जय’ अशा घोषणाही देतात. हा आवाज कानावर पडला की शत्रू सैनिकांना अती सावध राहणं गरजेचं बनतं. या रेजीमेंटच्या शौर्याचा परिणाम म्हणून त्यांना किलर मशीन व जंगल वाॅरियर या नावानंही ओळखलं जातं.

सद्यस्थितीत बिहार रेजिमेंटच्या २० तुकड्या, ४ राष्ट्रीय रायफल आणि २ प्रांतिक लष्करी तुकड्या देशसेवेच्या कार्यात रूजू आहेत. बिहार रेजिमेंटच्या कर्तृत्वाचा विचार करायचा झाल्यास, ५ मिलिट्री क्राॅस, ७ अशोक चक्र, ९ महावीर चक्र व ७० शौर्य चक्र एवढ्या पदकांनी रेजिमेंटला सन्मानित करण्यात आलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

चीननं कसा केला भारताचा विश्वासघात?, भारतीय जवानांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारच्या खात्यात जमा झाले एकाच दिवशी तब्बल 6500 कोटी, कसे ते बघा…

दररोज किती परप्रांतीय महाराष्ट्रात येतात? गृहमंत्र्यांनी सांगितला आकडा

फडणवीसांना तो धोका आणखी दिसतोय, उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More