सुकमा हल्ल्याचा बदला, २० नक्षलवाद्यांना कंठस्नान

सुकमा | सीआरपीएफने छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांकडून झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा बदला घेतलाय. बिजापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

सीआरपीएफने केलेल्या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात सीआरपीएफने वृत्ताला दुजोराही दिला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांविरुद्ध सुरु असलेली ही मोहीम अशीच सुरु राहणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या