payel mukherjee | कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी देशभर डॉक्टरांनी आंदोलन केलं. डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण ताजं असतानाच आता कोलकातामधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या (payel mukherjee) कारवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. कोलकाता येथील साऊथर्न एव्हेन्यू येथील काही दुचाकीवर स्वार असलेल्या अज्ञातांनी तिच्या कारवर हल्ला केला.याचा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्रीने संपूर्ण घटना सांगितली.
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला
अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रडताना दिसत आहे. तर, तिच्या कारच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. तिच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमल्याची दिसून येत आहे. काही बाईकस्वारांनी अभिनेत्रीला कारची काच उघडण्यास सांगितली. अभिनेत्रीने नकार दिल्यानंतर अज्ञातांनी दुसऱ्या बाजूने कारच्या काचा फोडल्या आणि पांढऱ्या रंगाची पावडर तिच्या तोंडावर फेकली, असं सांगण्यात येतंय. (payel mukherjee)
View this post on Instagram
या धक्कादायक प्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. पोलिसांनी अज्ञातांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या बाईकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओवर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते तिला पोलिसांत तक्रार दाखल कर, असा सल्ला देत आहेत.
कोण आहे पायल मुखर्जी?
अभिनेत्री पायल मुखर्जी (payel mukherjee) हिने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. बंगाली सिनेविश्वात पायल हिचं नाव फार मोठं आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता संजय मिश्रा याच्यासोबत पायल हिने ‘वो तीन दिन’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.
News Title – bike rider attacked on payel mukherjee
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावच्या 27 भाविकांचा मृत्यू
मोठी बातमी!’गब्बर’चा क्रिकेटला अलविदा; शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर
आज महाराष्ट्र बंद आहे की नाही?, कोर्टाच्या मनाईनंतर मविआने घेतला मोठा निर्णय
आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!