Bike Taxi l मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्रालयाने (Transport Ministry) मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईकरांना बाईक टॅक्सीची (Bike Taxi) सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे प्रवास अधिक स्वस्त आणि जलदहोणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या सेवेची अधिकृत घोषणा केली आहे.
बाईक टॅक्सी सेवा कशी असेल? :
– प्रवासासाठी प्रति किलोमीटर ३ रुपये भाडे आकारले जाणार आहे.
– बाईक टॅक्सीमध्ये GPS यंत्रणा अनिवार्य असेल.
– प्रवाशांना सुरक्षितता देण्यासाठी हेल्मेट बंधनकारक असेल.
– बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडे किमान ५० दुचाकी वाहने असणे गरजेचे आहे.
बाईक टॅक्सींच्या नंबर प्लेट्स पिवळ्या रंगाच्या असतील आणि दुचाकींसाठी वेगळा रंग ठरवण्यात येणार आहे.
चालकांना परिवहन विभागाकडून विशेष परवाना (बॅच) मिळणार असून, पोलीस पडताळणी झाल्यानंतरच तो दिला जाईल.
Bike Taxi l महिलांसाठी विशेष बाईक टॅक्सी सुविधा :
दरम्यान, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खास महिला बाईक रायडर असाव्यात, अशी सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. याशिवाय, बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असेल, जेणेकरून प्रवास अधिक सुरक्षित होईल.
तसेच ओला (Ola) आणि उबेर (Uber) प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा रॅपिडोने (Rapido) पूर्वी सुरू केली होती, मात्र टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या तीव्र विरोधामुळे ती बंद करण्यात आली होती. मात्र, आता सरकारच्या अधिकृत धोरणामुळे ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत.