मुंबई | साधारण दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकुळ घातला. कमी जास्त प्रमाणात आजही अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. चीनमधील वुहान येथील एका प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसचा उगम झाला असल्याचं म्हटलं जातं.
कोरोना व्हायरस आढळून आलेल्या वुहानमधील या प्रयोगशाळेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. कोरोना ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स आहे, असा दावा मेधा पाटकर यांनी केला आहे.
बिल गेट्स फाऊंडेशनने संपूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करायचे ठरवले आहे. स्वत: अमेरिकेतल्या 2 लाख 40 हजार एकरचा मालक असूनसुद्धा बिल गेट्सने आणि केंद्रातील कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनाला दाद दिली नाही, त्यामुळे 715 शेतकरी शहिद झाले. याला कॉर्पोरेटायझेशन जबाबदार आहे, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली.
दरम्यान, मेधा पाटकर यांनी ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्याच्या उल्लंघनाबाबत सहाय्यक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मेधा पाटकर यांनी बिल गेट्सबद्दल हा दावा केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘युवराजांना पेंग्विन म्हणताना…’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
“नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा”
‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल
“भाजपने स्वतःचा ईडी चालवायला माणूस ठेवला असेल”
Comments are closed.