बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला पत्नीशी घटस्फोट

नवी दिल्ली | मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला आहे. बिल गेट्स यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्याबरोबर गेली 27 वर्षे त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण आता त्यांनी थेट वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला आहे.

स्वतः बिल गेट्स यांनी एक पत्रक जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की, “आम्ही आमच्या नात्याचा खूप विचार करून अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या 27 वर्षात आम्ही तीन मुलांना मोठं केलं आणि जगभरातील लोकांना अर्थपुर्ण आयुष्य जगण्यासाठी एक संस्था देखील उभी केली आणि त्या विचारांवर आमचा विश्वास असून घटस्फोटानंतरही आम्ही ते काम सुरू ठेवू”, असं म्हटलं आहे.

अवघ्या 31 व्या वर्षी अब्जाधीश बनलेल्या बिल गेट्स यांनी 2000 सालानंतर आपल्या पत्नीच्या नावाने ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ या नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती. या सामाजिक कामासाठी त्यांनी भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन देशातील महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊन त्याचा अभ्यास केला.

पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना करणाऱ्या बिल गेट्स यांनी मेलिंडा यांच्याबरोबर मागची 27 वर्षे  यशाची विविध शिखरे गाठली आहेत. पण आता उर्वरित आयुष्यात ते कपल म्हणून एकत्र राहू शकत नाहीत, त्यामुळे नव्या आयुष्याला सुरुवात करायला आम्हाला खाजगीपण द्यावं, ही विनंती त्यांनी आपल्या पत्रकात करून ते पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

खुशखबर! सर्वांची कोरोना संकटातून अखेर सुटका होणार; ‘या’ संशोधनाचा निष्कर्ष आला समोर

पंढरपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More