बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राफेलचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

पॅरिस | फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. दसॉल्ट यांच्या अपघाती मृत्यूमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी शोक व्यक्त केला आहे. दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचे देखील सदस्य होते.

ओलिवियर दसाॅल्ट हे फ्रान्सचे मोठे उद्दोगपती होते. तसेच ते फ्रान्सच्या संसदेचे सदस्य देखील होते. राजनैतिक कारणे आणि हितांसाठी त्यांनी दसाॅल्ट बोर्डमधून त्यांचं नाव मागे घेतलं होतं. 2020 च्या फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत दसाॅल्ट यांना त्यांच्या दोन भाऊ आणि बहिणीसोबत 361 वे स्थान मिळालं होतं. दसाॅल्ट यांच्या झालेल्या मृत्यूवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी ट्वीटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.

ओलिवियर दसॉल्ट फ्रान्सवर प्रेम करायचे. त्यांनी उद्योग, नेता, हवाई दलाचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्यांचे असे अचानक जाणे एकप्रकारचे मोठे नुकसान आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्ठांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं मॅक्रो यांनी सांगितलं आहे.

भारताला सर्वाधिक चपळ आणि खतरनाक असे जे लढाऊ विमान राफेल मिळालेले आहे, ते दसॉल्ट एव्हीएशनने बनविलेले आहे. ही कंपनी ओलिवियर दसॉल्ट यांची आहे. त्यांच्या वडीलांनी ही कंपनी स्थापन केली होती.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; अजित पवार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

कर्नाटकमधील मंत्र्याच्या SEX CD प्रकरणात आला हा मोठा ट्विस्ट!

कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार; सरकारकडून ही योजना लागू

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोेखी भेट; पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More