बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

नवी दिल्ली | कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastav died) हिचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. 24 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पंखुरीचे निधन झाले आहे.

पंखुरी हिने 2012 साली पंखुरी रेंटल स्टार्टअप ग्रॅबहाऊसची सुरुवात केली होती. पंखुरी मुळची मध्यप्रदेशातील झांसी येथील आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ती मुंबईत आली होती. मुंबईत आल्यानंतर  घर शोधण्यास अडचणी आल्यानंतर तिला एका नवीन उद्योगाची कल्पना सुचली होती. त्यानंतर तीने घर शोधण्यास मदत करणारी कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती.

अत्यंत कमी वयात पंखुरीने उद्योग क्षेत्रात नाव कमावले होते. 2012 रोजी तीने पंखुरी ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती. 2016 मध्ये ऑनलाईन क्लासीफाईल कंपनी क्विकरने त्याची खरेदी केली होती. पंखुरीने सिकोइया इंडीयाच्या अक्सलेरेशन कार्यक्रमांतून 3.2 मिलीयन डॉलरची रक्कम जमवली होती.

दरम्यान, अवघ्या 20 हजारांच्या भांडवलावर पंखुरीने कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर या कंपनीची वर्षाची उलाढाला 720 कोटींपर्यंत पोहोचली होती. पंखुरीने कमी वयात उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली होती. मात्र, पंखुरीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या-

ST Strike: “सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी”

आनंद महिंद्रांचा दिलदारपणा; हात-पाय नसलेल्या ‘त्या’ व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

सोनं-चांदीच्या दरात वाढ, वाचा आजचे ताजे दर

“…अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला, तसाच त्यांच्या मुलांचाही होईल”

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More