Bima Sakhi Yojana | राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रचंड गाजली. या विधानसभेत ही योजना गेमचेंजर ठरली. महायुती सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीपूर्वी महायुतीने या पैशांत वाढ करत 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने आता ते आपलं आश्वासन पूर्ण करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (Bima Sakhi Yojana)
महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यातच केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची मोठी संधी असणार आहे. आता ही योजना नेमकी काय आहे, त्यात काय लाभ मिळणार तसेच यासाठी पात्रता काय असणार?, त्याबाबत जाणून घेऊयात.
काय आहे विमा सखी योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. (Bima Sakhi Yojana)
योजनेसाठी अटी काय आहेत?
या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार असून योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तसेच महिलेचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असायला हवे.
योजनेतून काय लाभ मिळणार?
या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. तसेच, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर देखील संधी दिली जाईल. (Bima Sakhi Yojana)
स्टायपेंड किती दिला जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7 हजार रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6 हजार केली जाईल. तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5000 रुपये होईल. महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमीशनही दिले जाईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल. (Bima Sakhi Yojana)
News Title : Bima Sakhi Yojana
महत्वाच्या बातम्या-
“मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर ठरवा, आधी…”; ‘या’ बड्या नेत्याची महायुतीकडे मोठी मागणी
आज दुर्गाष्टमीला देवी दुर्गा ‘या’ राशींना देणार सुख-समृद्धी, धनलाभाचे देखील संकेत
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!
मोठी बातमी! मागच्या सरकारमधील ‘या’ दोन मंत्र्यांचा पत्ता कट होणार?
‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये घेतले; माधुरीच्या गौप्यस्फोटाने सगळीकडे एकच चर्चा!