Prime Video | आजकाल घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा ट्रेंड (Trend) चांगलाच वाढला आहे. प्रेक्षकांची पसंती आणि मागणी लक्षात घेता, विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन आणि हटके चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. यातील क्राईम थ्रिलर (Crime Thriller) जॉनर (Genre) प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. त्यामुळे निर्माते देखील हॉरर (Horror) आणि थ्रिलर (Thriller) चित्रपट आणि वेब सिरीज मोठ्या प्रमाणावर बनवताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरही (Box Office) त्यांचीच चलती दिसून येते. चला तर मग, प्राइम व्हिडिओवरील टॉप ट्रेंडिंग क्राईम थ्रिलर सिरीजवर एक नजर टाकूया. (Prime Video)
‘या’ सिरिज पाहून उडेल थरकाप
मिर्झापूर (Mirzapur): ही सिरीज एक क्राईम थ्रिलर आहे. या सिरीजमधील भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. कालीन भैय्या (Kaleen Bhaiya), गुड्डू (Guddu) आणि मुन्ना (Munna) या पात्रांनी ही सिरीज अजरामर केली आहे. गँगवॉर (Gang War), सत्ता संघर्ष आणि जबरदस्त ॲक्शन (Action) यामुळे ही सिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली.
ब्रीद: इनटू द शॅडोज (Breathe: Into the Shadows): मानसिक आजार असलेल्या व्यक्तीवर आधारित असलेली ही सिरीज एक सायकोलॉजिकल थ्रिलर (Psychological Thriller) आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) स्टारर या सिरीजमधील थरार शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. (Prime Video)
पाताळ लोक (Paatal Lok): पोलीस आणि गुन्हेगारी जगतावर आधारित असलेली जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) स्टारर लोकप्रिय वेब सिरीज ‘पाताळ लोक’ 2020 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सिरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता या सिरीजचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
द फॅमिली मॅन (The Family Man): श्रीकांत तिवारी (Shrikant Tiwari) नावाच्या एका सामान्य माणसाची ही कथा आहे, जो गुप्तचर विभागात काम करतो. त्याचे काम आणि कौटुंबिक आयुष्यातील तारेवरची कसरत या सिरीजमध्ये पाहायला मिळते. ॲक्शन, थ्रिल आणि कौटुंबिक भावनांचे अनोखे मिश्रण असलेली ही सिरीज मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
इनसाइड एज (Inside Edge): क्रिकेट जगतातील (Cricket World) मॅच फिक्सिंग (Match Fixing), राजकारण (Politics) आणि पैशाचा हव्यास यांचे चित्रण करणारी ही सिरीज क्रिकेटच्या मैदानावर चालणाऱ्या पडद्यामागील गोष्टींवर प्रकाश टाकते. स्पोर्ट्स (Sports) आणि क्राईम थ्रिलचे मिश्रण या सिरीजमध्ये पाहायला मिळते. (Prime Video)
Title : Binge-worthy Crime Thrillers on Prime Video