बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिपीन रावत जिवंत होते, मी त्यांना वाचवू शकलो असतो”, प्रत्यक्षदर्शीच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली | चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा काल अपघात (Helicopter Accident) झाला. या भीषण अपघातात बिपीन रावत (Bipin Ravat) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे सध्या देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जनरल बिपीन रावत (Bipin Ravat) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी समोर येत असून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत आहे. बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनं शेवटच्या क्षणी काय घडलं याविषयी सांगतिलं आहे.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत, प्रत्यक्षदर्शीनं बिपीन रावत यांना शेवटच्या क्षणी पाहिलं होतं. ते जिवंत होते मी त्यांना वाचवू शकलो असतो मात्र अपघातामुळे ते गंभीर जखमी असल्यानं त्या व्यक्तीला ते ओळखू आले नाहीत. रावत हे पाणी मागत होते मात्र आमच्याकडे तेव्हा त्यांना देण्यासाठी पिण्याचं पाणी नव्हतं.

दरम्यान, मुलाखतीत हा दावा केलेल्या व्यक्तीचं नाव शिवकुमार असून त्यानं पुढं सांगतिलं की, नंतर जेव्हा मला फोटो दाखवण्यात आला तेव्हा मला माहिती पडलं की, ते सीडीएस बिपीन रावत हे होते जे आमच्याकडून पणी मागत होते.

थोडक्यात बातम्या – 

“स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात”

Omicron रूग्णांमध्ये सापडतात ‘ही’ एकसारखी लक्षणं; तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय हे कसं समजणार?”

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More