बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् बिपीन रावत यांच्या आयुष्याचा शेवटही डिसेंबरमध्येच झाला!

नवी दिल्ली | सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं बुधवारी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दुख:द निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. केवळ भारतातूनच नाही तर इतर देशातूनही बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. रावत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत.

बिपीन रावत यांचं काल म्हणजेच 9 डिसेंबरला निधन झालं. मात्र त्यांच्या निधनानंतर एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे रावत आणि डिसेंबर महिना यांतील कनेक्शन. रावत यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटना या डिसेंबरमध्येच घडल्या आहेत. अगदी लष्करातल्या पदार्पणापासून तर मृत्यूपर्यंत. या सर्वच घटना डिसेंबरमध्येच झाल्या आहेत.

रावत यांनी ज्यावेळी लष्करात लष्करी अधिकारी म्हणून जबाबदारी घेतली ती तारीख होती 16 डिसेंबर 1978. त्यानंतर 2 वर्षांनी जेव्हा रावतांना प्रमोशन मिळून ते लेफ्टनंट झाले ती तारीख होती 16 डिसेंबर 1980. त्यानंतर पुन्हा एका जेव्हा 9 वर्षांनी त्यांच प्रमोशन झालं ती ही तारीख होती 16 डिसेंबर. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा 2015 ला डिसेंबर महिन्यातच प्रमोशन मिळालं होतं.

दरम्यान, बिपीन रावतांचे पुढे 2 वेळा प्रमोशन झालं आणि तेही डिसेंबर महिन्यात. इतकच काय रावतांता मृत्यू झाला तोही डिसेंबर महिन्यातच. या सर्व घडामोडी पाहता हा निव्वळ योगायोग आहेत का आणखी काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र रावत यांचं डिसेंबरशी असलेल कनेक्शन लक्ष वेधणारं आहे, एवढं मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या-

”जनरल बिपीन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीच विसरणार नाही”

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात ‘हे’ हेलिकॅाप्टर

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More