महाराष्ट्र मुंबई

“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”

मुंबई | बर्ड फ्लू पक्ष्यांमध्ये होणारा आजार असला तरी तो माणसांनाही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

बर्ड फ्ल्यू हा पक्ष्यांमध्ये होणारा आजार आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरतो. हा विषाणू पक्ष्यांसाठी घातक आहे. माणसांनाही त्याची लागण होऊ शकते. पण माणसांना या रोगाची लागण होणं अत्यंत दुर्मिळ आहे. पण काळजी घेतली पाहिजे, असं अजित रानडे म्हणाले.

पक्ष्यांसोबत राहणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. पोल्ट्रीफार्ममध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा शिरकाव होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचं अजित रानडे यांनी म्हटलंय.

गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहिली तर जगात आतापर्यंत 40 ते 42 लोकांना बर्ड फ्ल्यूची लागण झालेली आहे. महाराष्ट्रात तर अशी एकही केस आढळलेली नाही, असं अजित रानडे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या