Top News देश

“बर्ड फ्लूमुळं व्यावसायिकांचं नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका”

नवी दिल्ली |  महाराष्ट्रासह राज्यातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळं अनेक पक्षी मृत्यू पावले आहेत. त्यानंतर त्यातील अनेक राज्यांनी कोंबड्या आणि कुक्कुटपालनांतर्गत निर्मिती केलेल्या इतर उत्पादनांवर बंदी घातली आहे. मात्र केंद्राच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयानं कोंबड्यांची आयात-निर्यात आणि इतर उत्पादनांवर बंदी न घालण्याचं आवाहन केलं आहे.

आयात निर्यात प्रभावित झाली तर कुक्कुटपालन व्यायसायिकांचे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळं पुरवठ्यावर कोणताही परिणाम न होण्यासाठी राज्यांनी बंदी घालू नये, असं केंद्रानं म्हटलं आहे.

बर्ड फ्लूमुळे अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडेल. सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे; तिच्याशी दोन हात करण्यासाठी राज्यांनी आरोग्य आणि वनविभागासोबत समन्वय ठेवावा. तसंच या मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवून बंदीच्या निर्णयावर पुन्हा एकाद विचार करण्याचंही आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.

दरम्यान, कोंबड्या मरण्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान होण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र, भीतीपोटी नागरिकांनी कोंबड्यांचे मांस खाणे सोडून दिल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांमधील गैरसमज, अफवा या सर्व गोष्टींमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर 75 टक्के प्रभाव पडला आहे.

थोडक्यात बातम्या-

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या