नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच भाजपचे राजस्थानधील प्रदेश सरचिटणीस आणि रामगंजमंडीचे आमदार मदन दिलावर यांनी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
शेतकरी आंदोलनात बसलेले शेतकरी दररोज चिकन बिर्याणी आणि इतर स्वादिष्ट जेवणाच्या पाट्या करत आहेत. यामुळे बर्ड फ्लूचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरविण्यात या शेतकरी आंदोलनाचा मोठा हात असल्याचं मदन दिलावर यांनी म्हटलं आहे.
मोठ्या संख्येने तळ ठोकून बसलेल्या आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरुन उठवले पाहिजे. नाहीतर बर्ड फ्लूसारख्या प्राणघातक रोगाचा प्रसार करणारं शेतकऱ्यांचे हे आंदोलन देशात मोठं संकट निर्माण करेल, असंही दिलावर म्हणाले.
दरम्यान, मदन दिलावर यांचं हे वादग्रस्त वक्तव्य सोशल माध्यमांवर पसरलं आहे. दिलावरांवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडेल
‘संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य
“आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे, यांनी राज्याला बिघडवू नये”
“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”
ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल