कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन
नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर चिंतेत भर पाडली आहे. आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग पसरायला लागल्याचं चित्र आहे. अशातच आणखी चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येत आहे.
देशात कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा (Bird Flu) शिरकाव पहायला मिळत आहे. चीनमधील हेनान प्रांतातील एका व्यक्तीमध्ये H3N8 स्ट्रेन बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्याचं समोर आलं आहे. माणसामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे पहिले प्रकरण एका मुलामध्ये आढळून आले आहे. एका चार वर्षाच्या मुलामध्ये तापासह इतर अनेक लक्षणे दिसून आली. चाचणी केल्यावर त्यात बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेन संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) सांगितले की, लोकांनी याबद्दल घाबरण्याची गरज नाही. हा संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा आहे.
थोडक्यात बातम्या –
छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”
“किरीट सोमय्या भाजपचा नाचा आणि देवेंद्र फडणवीस त्याचे सूत्रधार”
मुंबईतून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर, टास्क फोर्सने केली महत्त्वाची मागणी
Comments are closed.