बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर चिंतेत भर पाडली आहे. आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग पसरायला लागल्याचं चित्र आहे. अशातच आणखी चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येत आहे.

देशात कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा शिरकाव पहायला मिळत आहे. केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायत मधून बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रसार झाल्याचं समजतंय. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पहायला मिळत आहे.

पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) असल्याचं समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशूपालन, आरोग्य आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आणि त्या पक्षांना मारण्याचे आदेश दिले.

दरम्यान, बर्ड फ्लूचा संसर्ग हवेतून पसरत असल्यानं प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

काँग्रेसचा सेल्फगोल! “पक्षाच्या नाहीतर अपक्ष उमेदवाराला मतदान करा”

Omicronचा धोका वाढतोय! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दो दिलों का मिलन! कैफ-विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More