देश

कोरोनाने हैरान केलंय… आता आला ‘बर्ड फ्लू!’

नवी दिल्ली |  जगभर पसरलेल्या कोरोनाने अनेकांच्या नाकी नऊ आलं आहे. हाच धोका टळला नसताना आता ‘बर्ड फ्लू’ची साथ आल्याचं समोर आलं आहे. केरळच्या मलप्पुरमनच्या परप्पनगडीत बर्ड फ्लू ची साथ आली आहे.

केरळात बर्ड फ्लू ची साथ आल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. ‘बर्ड फ्लू’चा पादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कोंबड्यांचे कलिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. धोका आहे असं वाटल्यास कोंबड्या पोल्ट्री किंवा फार्म हटवण्याचे आदेश शासनाने दिला आहे.

केरळात बर्ड फ्लू ची साथ आल्याचं स्पष्ट होताच त्याच्यावरील उपचारांसाठी 1 किलोमीटरच्या परिसरात 10 विशेष पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून केरळमध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोंबड्यांची ने-आण करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहितीही मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी

कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS

महत्वाच्या बातम्या-

‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा धुपिया सोशल मीडियावर ट्रोल

विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्या; सक्षणा सलगर यांची मागणी

‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या