बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मृत म्होरक्याचा वाढदिवस अन् रावण टोळीचा प्लॅन, पोलिसांनी दाखवला इंगा!

पुणे | भारतात सर्वत्र गुन्हेगारांच्या टोळीवर चित्रपटांचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हत्यारांचा वापर करून फोटो आणि व्हि़डीओ सोशल मीडियावर शेअर केला जातो. तर वाढदिवसाचे मोठमोठे बॅनर देखील लावले जातात. तर तलवारीने केक कापण्याची परंपराच असते. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या रावण टोळीच्या प्लॅनला उधळवून लावत पोलिसांनी टोळीला चांगलाच इंगा दाखवला आहे.

पिंपरी चिंचवड भागात सतत टोळी युद्धे सुरू असतात. टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करून या टोळ्या एकमेकांना खिजवत असतात. पिंपरी चिंचवड भागातील रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा काही वर्षापुर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या वाढदिवसा दिवशी रावण टोळीनं वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं.

वाढदिवस साजरा करण्याच्या आधीच पोलिसांनी तत्परता दाखवत रावण टोळीला अटक केली. वाढदिवस साजरा करणाऱ्यासाठी एकत्रित जमलेल्या 6 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. यात अनिकेत जाधव याचा भाऊ बाळा राजू जाधव याला देखील अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलिस ठाण्यात या 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, बाळा जाधव याच्याकडे 1 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे देखील सापडली आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णाप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट, पाहा धक्कादायक व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांनो फोनवर बोलताना आता नीट बोला, ‘या’ 9 सूचना पाळाव्या लागणार!

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More