बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

जळगाव | वाढदिवसाला मित्रासोबत फिरायला जाणं हे ठरलेलंच असतं. पण दोन मित्रांवर वाढदिवसाच्या दिवशी फिरायला जाणं घातक ठरलं आहे. वाढदिवस आहे म्हणून धबधब्यावर फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जळगाव भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाढदिवस आहे म्हणून उज्वल पाटील आणि जयेश माळी हे दोघे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी फिरायला गेले. त्या ठिकाणी ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते.

जळगाव जिल्ह्यातील खेडी येथील रहिवासी असणारा उज्ज्वल पाटील याचा वाढदिवस होता. तो एका मार्केटींग कंपनीत कामाला होता. एमबीएचं शिक्षण झालेला उज्ज्वल हा आपल्या काही मित्रासोबत सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वाॅटरफाॅल येथे गेला होता. सोबतचा मित्र जयेश माळी सोबत तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

सायंकाळ झाली असताना सुद्धा उज्वल आणि जयेश हे पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. सायंकाळ असल्याने ते पाण्यात खोलवर गेले  आणि बुडाले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना रात्रीच्या अंधारात जास्त काही करता आलं नाही. दुसऱ्या दिवशी बऱ्हाणपुर पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या 

“माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो”

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

दिवाळीला गाडी घ्यायचा विचार करताय?, Hyundai च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट!

चिमुकल्यासाठी सफाई कामगार ठरला देवदूत; पाहा ‘हा’ थरारक व्हिडीओ

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More