‘बिस्लेरी’वर मराठी नाव; मनसे आणि ‘स्वाभिमान’मध्ये श्रेयवाद

मुंबई | बिसलेरी या पाण्याच्या उत्पादनाने आपल्या बाटल्यांवर मराठी भाषेत आपलं ब्रँडनेम टाकण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यावरुन मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. 

मनसेने बिसलेरीला लिहिलेलं पत्र दाखवून आपल्यामुळे बिसलेरी नाव मराठी झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून बिसलेरी प्रशासनाला लिहिलेलं पत्रही सोबत जोडलं आहे. 

मात्र थोडक्यातनं यासंदर्भात माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता मनसे आणि स्वाभिमानने पत्र पाठवण्याच्या दोन महिने आधीच बिसलेरीने आपलं ब्रँडनेम मराठीसह प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 60 लाख रुपयांची वेगळी तरतूदही केलीय.