महाराष्ट्र मुंबई

तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरूणाला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने जितेंद्र आव्हाड यांना 4 प्रश्न विचारले आहेत.

तरूणाच्या घरी जे गणवेशधारी पोलिस गेले होते ते त्या तरूणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले? तर तरूणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानेच धाब्यावर बसवले जात आहेत का?, असे सवाल भाजपने विचारले आहेत.

पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्रात गुंडगीरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का? आणि त्या तरूणाने मंत्री महोदयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असे चार सवाल भाजपने जितेंद्र आव्हाड यांना विचारले आहेत.

दरम्यान, आव्हाड यांनीही याप्रकरणावर मौन सोडलं आहे. खरं तर त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी मारहाण झालेल्या ठिकाणी नव्हतो. गेल्या 24 तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमधला आढावा घेण्यात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं, असं आव्हाड म्हणाले आहेत.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या