नागपूर महाराष्ट्र

काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने भाजप कार्यकर्त्यांना दिली घरात घुसून मारण्याची धमकी

Loading...

नागपूर : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना नागपूरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनिल केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.

जे कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारू. यानंतर सावनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आमदार केदार सिलेवाडा गावात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

Loading...

सुनिल केदार हे काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. सिलेवाडा येथे सिटी बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मात्र, आयोजकांनी आपल्याला कार्यक्रमाचे आमंत्रणही दिले नाही, असा आरोप आमदार सुनिल केदार यांनी केला. त्यावरुन कार्यक्रमात वादावादी झाल्याचं कळतंय.

आमदार केदार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या