भाजपच्या ‘मी लाभार्थी’वर राष्ट्रवादीचा जोरदार ‘पोस्टर वार’!

मुंबई | भाजपने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘मी लाभार्थी’ नावाने जोरदार जाहिरातबाजी सुरु केलीय. मात्र या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादीने जोरदार पटलवार केलाय. 

लाभार्थी आपल्याला काय फायदे झाले ते सांगतो, असं या जाहिरातीचं स्वरुप आहे. राष्ट्रवादीने मंत्र्यांच्या भ्रष्टाराचे मुद्दे उपस्थित करुन त्याला मी लाभार्थी ही टॅगलाईन जोडली आहे. 

अमित शहा, विनोद तावडे, नारायण राणे, रावसाहेब दानवे, गिरीश बापट, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्याविरोधात पोस्टर व्हायरल करण्यात आलेत. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट केलेत.