मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परीस्थितीत शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये फक्त 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानिर्णयानंतर अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने याविषयावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
यासंदर्भात भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपने एक ट्विट केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परीवार संवाद या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ शेअर करत, शिवजयंतीवर कोरोनाचे सावट आणि यांच्या सभेला सगळे कोरोना घरी ठेऊन येतात का?, पुरोगामी पडद्यामागे लपून द्वेशाचं राजकारण करणं हे सरकार कधी थांबवणार?, असे प्रश्न भाजपने महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत.
राज्य सरकारकडून शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रभात फेरी, बाइक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसंच, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करुन 10 जणांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र भाजपच्या विरोधानंतर या नियमात बदल करत 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील यासंदर्भात ट्विट करत महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाहीतर काय टिपू सुलतानची जयंती साजरी करणार का?, अशा शब्दांत सरकारवर टीका करत शिवजयंतीच्या नियमीवलीबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवरायांची जयंती साजरी करायला निर्बंध आणि यांच्या सभांना मात्र सगळे कोरोना घरी ठेऊन येतात. ‘माझी सत्ता, माझी मनमानी’ असा राज्य सरकारचा कारभार चालला आहे. pic.twitter.com/ymP65y9U2g
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 14, 2021
थोडक्यात बातम्या –
शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…
मोदींच्या कुटुंबातील व्यक्तीनं केलेल्या आरोपानं खळबळ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!
पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!
अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज