बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

यवतमाळ | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता भाजप आक्रमक झाले आहेत. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. याबाबत भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी माहिती दिली आहे.

शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला अशी टरटरुन कसलं काय नसलं की. म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. सरळ चपला घालून. असं वाटलं त्याचं चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं. लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची, असं वक्तव्य उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर हा वाद आणखी वाढणार असल्याचं दिसतंय.

भाजपने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याची तयारी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, यवतमाळसह 5 पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणे पेटून उठलेत?, मध्यरात्री केलं हे ‘करारा जवाब’ देणारं ट्विट

गाढवाची गोष्ट सांगत अर्जुन खोतकरांची राणेंवर टीका, पाहा व्हिडीओ

“आता महाविकास आघाडी सरकारने मारत बसा माशा”, पाहा आठवलेंच्या भन्नाट कवितेचा व्हिडीओ

राऊत म्हणाले, ‘कोण राणे?,’ चंद्रकांतदादा म्हणतात, ‘कोणता सामना, आम्ही किंमत देत नाही!’

नारायण राणेंनंतर कुणाचा नंबर?; ‘या’ नेत्यांवर अटकेची टांगती तलवार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More