नवी दिल्ली | सोशल नेटवर्किंग साईट ट्विटवर गुरुवारी एक अजब प्रकार पहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही काळासाठी त्यांचा प्रोफाईल फोटो काढून टाकण्यात आला होता.
अमित शाह यांच्या ट्विटरच्या प्रोफाईल फोटोवर एका व्यक्तीने कॉपीराईटच्या नियमांतर्गत दावा केला होता. या कारणाने ट्विटरने गुरुवारी रात्री काही तासांसाठी अमित शाह यांचा ट्विटवरवरील प्रोफाईल फोटो काढून टाकला होता.
Twitter restores profile photo of Union Home Minister Amit Shah’s account, earlier it had removed the photo over claims in “response to a report from a copyright holder”. pic.twitter.com/uhW3kNtpgn
— ANI (@ANI) November 12, 2020
यासंदर्भात ट्विटरने स्पष्टीकरण देखील दिलंय. कॉपीराईटच्या नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी आम्ही अमित शाह यांचं अकाऊंट लॉक केलं होतं. मात्र त्यानंतर काही वेळात त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आलं.
दरम्यान अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर कोणी कॉपीराईटचा क्लेम केला होता याची अजून माहिती मिळू शकलेली नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत
मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार
..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर
“राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत”
“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”
Comments are closed.