बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

नवी दिल्ली | दिल्ली पोलीस आयुक्तपदी नुकतीच राकेश अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अस्थाना हे सीबीआयचे माजी संचालक राहिले आहेत. अस्थाना यांची आयुक्तपदावर नियुक्ती केल्यानंतर दिल्ली सरकारने त्यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला. दिल्ली सरकारने त्याविरूद्ध विधानसभेत प्रस्ताव पारित केला आहे. त्यानंतर आपने भाजप आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

भाजप नेते म्हणतात की राकेश अस्थाना सीबीआय प्रमुख असताना त्यांनी एका पक्षाच्या जावयावर कारवाई केली होती. परंतु ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की, त्यांच्यावर काय आणि किती कारवाई झाली. भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग आहे. जावई तुरुंगात जाईल तेव्हाच मोदी सरकार पडेल, असं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे.

राकेश अस्थाना यांची नियुक्ती ही नियमांच्या विरोधात असल्याचं आपने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राकेश अस्थाना यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. ज्यांचा कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यांची आयुक्तपदी नियु्क्ती केली जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे, असं आप आमदार संजीव झा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सत्येंद्र जैन यांनी प्रियंका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा विषयी भाष्य केलंय. राकेश अस्थाना सीबीआयमध्ये असताना त्यांनी राॅबर्ट वाड्रा यांची केस पुन्हा तपासासाठी उघडली होती. त्यानंतर प्रियंका गांधी आणि वाड्रा यांना अनेकदा सीबीआयच्या पायऱ्या चढाव्या लागल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! महिला डाॅक्टरला तब्बल तीन वेळा झाली कोरोनाची लागण

‘तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय?’; संजय राऊत आक्रमक

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More