काँग्रेस पाहूण्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेत्याच्या पायघड्या; चर्चांना उधाण!

बीड | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम सुरू आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

परंतु अंबाजोगाईतील जनसंघर्ष यात्रेत भाजपा सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी संध्याकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी पाहुणचार घेतल्याचं समोर आहे.

नसंघर्ष यात्रेची सभा पार पडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला.

दरम्यान, या भेटीवेळी मोठी खलबतं झाली असल्याचं समजतंय. मात्र भाजपा नेत्याने काँग्रेसच्या दिग्गजांचा पाहुणचार करण्यासाठी नेमक्या “पायघड्या” का घातल्या? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

– भाजपकडून निवडणूकीची पहिली उमेदवारी यादी जाहीर, मुख्यमंत्री या मतदार संघातून लढणार!

-…म्हणून अहमदाबाद विद्यापीठात रूजू होण्यास रामचंद्र गुहांनी दिला नकार!

-… याप्रकरणी अमित शहांना न्यायालयाकडून मोठा दिलासा!

-अमित शहा आणि मोहन भागवतांची खलबतंं; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

-…म्हणून धोनीला टी-20 मधून वगळलं; विराटचा मोठा खुलासा