काँग्रेस आणि भाजपला त्यांचा अहंकार नडला- असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद |तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेसला त्यांचा अहंकार नडला, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दोन्ही पक्षांवर निशाना साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी यांनी विरोधकांवर टीका करताना चुकीची भाषा वापरली. या नेत्यांचे गर्वहरण झालं, असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी तेलंगणामध्ये प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी त्यांच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभेलाही आम्ही सर्वशक्तीनिशी सामोरं जाऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुपाली शिनगारे ही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन  

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!