“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”

पुणे | सत्ताधाऱ्यांनी अगोदर माणसांकडं पाहावं, मग त्यानंतर मंदिराकडे लक्ष दयावं, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

देशातील अनेक माणसं किड्या मुंग्यांप्रमाणे मरत आहेत, तरी सरकार केवळ मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यासमोर सध्या अनेक गंभीर मुद्दे आहेत. मात्र, त्यावरुन लक्ष वळवण्यासाठी सरकार राम मंदिर, दंगली असे मुद्दे समोर आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, शेतकरीबहुल मराठा समाजाची आरक्षणाबाबतीत फसवणूक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असं त्यानी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…