मोठी बातमी! भाजपकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

पुणे | अखेर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपचं (Bjp) कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक लढायचं ठरलं आहे. दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने (Bjp) चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना चिंचवडची निवडणूक लढणार नाही.

भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक साठी हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता मविआतून नेमकी कोणती घोषणा होणार, हे पहावं लागेल.

निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने कुणाच्याही नावांची घोषणा केली नव्हती. मात्र आज अखेर भाजपने या दोन्ही ठिकाणचे अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-