Bjp | भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने (Bjp) जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या (Bjp) दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला
पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपला जोर लावावा लागणार आहे. धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जतमधून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील 9 मतदार संघाचा समावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजना व विकासकामांच्या सहाय्याने या सर्व उमेदवारांना विजय मिळण्यास मदत होईल हा मला विश्वास आहे. सर्व… pic.twitter.com/aLT59UgdkX
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 26, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका!
शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर
“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान
अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!